मुलं अभ्यासाला बसली की तुम्हीदेखील त्यांच्यासह बसा. तुम्ही फोन, लॅपटॉपवर व्यस्त राहण्यापेक्षा अभ्यासात त्यांची मदत करा. यामुळे त्यांनाही अभ्यास करायला प्रोत्साहन मिळतं.
मुलांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करा. शिवाय ऑनलाइन क्लासमध्ये ते काय शिकले, त्यांनी अभ्यास कसा केला हे त्यांना विचारा.
तुमच्या मुलांची शिकण्याची पद्धत नेमकी कशी आहे ते समजून घ्या. त्यांना एखादी गोष्ट बोलून, वाचून लक्षात राहते की लिहून लक्षात राहते ते पाहा. जेणेकरून त्यांना शिकवणं तुम्हाला सोपं जाईल.
तुमचे विचार मुलांवर थोपवू नका. नेहमी तुमचंच खरं करू नका. मुलांचंही ऐकून घ्या. मुलं काय बोलतात, त्यालाही महत्त्व द्या यामुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढतो.