मुंबई : तुम्ही आम्ही सगळेजण डेबिट कार्ड वापरतो. आजकाल डिजिटल पेमेंट आणि क्रेडिट कार्डचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण कधी विचार केला आहे का तुमचा आवडता नेता डेबिट कार्ड वापरतो की क्रेडिट कार्ड?
2/ 6
आजकाल सगळीकडे क्रेडिट कार्डचा ट्रेन्ड आला पण खासदार सुप्रिया सुळे ह्या खूप पूर्वीपासून क्रेडिट कार्ड वापरत आहेत. त्या कोणत्या बँकेचं क्रेडिट कार्ड वापरतात जाणून घेऊया.
3/ 6
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एका मुलाखती दरम्यान माहिती दिली. त्यांना मुलाखती दरम्यान क्रेडिट कार्ड वापरता का असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या की मी फक्त क्रेडिट कार्डच वापरते.
4/ 6
माझ्याकडे डेबिट कार्ड नाही. याचं काही खास कारण नाही. मात्र मी इतके वर्ष क्रेडिट कार्ड वापरते.
5/ 6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट कार्ड माझ्याकडे आहे. ते संपूर्ण भारतात चालतं. त्यामुळे ते एकच मी वापरते. ते एकच कार्ड वापरणं मला सोयीचं वाटतं त्यामुळे दुसरं कोणतं कार्ड वापरत नाही.
6/ 6
क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरणं हा माझा चॉइस नव्हता. माझ्या नवऱ्याने मला क्रेडिट कार्ड दिलं. त्यामुळे मी ते वापरायला लागले. ही त्यांची निवड आहे. मी याबाबत तेवढा विचार करत नाही, ते आनंदाने वापरते.