गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवणाऱ्या जवानांसोबत जंगल पालथ घालून अनेक स्फोटक शोधून जवानांचे जीव वाचवणाऱ्या वेन्स या श्वानाचा काल अचानक मृत्यू झाला.
या लाडक्या श्वानाला सीआरपीएफ कडून सलामी देत शासकीय इतमामात भावपूर्ण पद्धतीने अंत्यसंस्कार करून निरोप देण्यात आला.
14 नोव्हेंबर 2019 रोजी तरालु येथे जन्मलेल्या वेन्सची प्रशिक्षणानंतर सीआरपीएफच्या गडचिरोली येथील बटालियनमध्ये नियुक्ती झाली होती.. 13 एप्रिल 2019 पासून वेन्सने अति संवेदनशील माओवाद प्रभावित भागात अनेक अभियानामध्ये जवानांसोबत भाग घेतला होता.
जवानांसोबत जंगलात फिरताना माओवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यासाठी पेरून ठेवलेले अनेक आयडी आणि इतर स्फोटके वेन्सने शोधून काढली होती.
स्फोटके शोधून शत्रूवर हल्ला करण्यात तरबेज असलेल्या वेन्स मुळे अनेक जवानांचे जीव वाचले.काल अचानक वेन्सचा मृत्यू झाला.
वेन्सच्या मृत्यूनंतर अधिका-यांनी त्याला पुष्पचक्र वाहुन श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर सीआरपीएफ च्या अधिकारी आणि जवानांनी पाणवलेल्या डोळ्यांनी वेन्सवर अंत्यसंस्कार करुन शेवटचा निरोप दिला.