advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / बागेश्वर धामच्या बाबांना थांबवावी लागली कथा, म्हणाले येऊ नका, तिकीट रद्द करा, पण कारण काय?

बागेश्वर धामच्या बाबांना थांबवावी लागली कथा, म्हणाले येऊ नका, तिकीट रद्द करा, पण कारण काय?

बागेश्वर धामचे पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रंगात संपूर्ण बिहार रंगलेला दिसतत आहे. त्यामुळेच की काय, हनुमान कथा ऐकण्यासाठी एवढी गर्दी झाली की बागेश्वर धाम पीठाधीश्‍वर यांना कथा मध्यंतरी थांबवावी लागली. तसेच उद्या दिव्य दरबार नसल्याची घोषणा त्यांना करावी लागली. तसेच, कथेत कोणीही यायचे नाही, असे सांगावे लागले. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात. (सच्चिदानन्द, प्रतिनिधी)

01
पं. धीरेंद्र शास्त्री यांनी स्वतः मंचावरून लोकांना आवाहन केले की, जे लोक रेल्वेचे तिकीट काढून पाटण्याला येत आहेत त्यांनी कृपया परत जावे.

02
पुढे म्हणाले की, दिव्य दरबार सध्या स्थगित असून त्यात काही बदल झाला तर सोमवारी सकाळी ते स्वतः त्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे बिहारच्या जनतेपर्यंत पोहोचवतील.

03
रविवारी हनुमान कथेचा दुसरा दिवस होता. कथा पंडालमध्ये सुमारे 10 लाख लोक पोहोचले होते. त्यामुळे पंडालसोबतच आजूबाजूची जागाही भरली गेली होती. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच उष्णतेचा प्रकोपही मोठा होता.

04
त्यामुळे लोकांची अडचण पाहून बाबा पं.धीरेंद्र यांनी सोमवारी दिव्य दरबार होणार नसल्याचे जाहीर केले. लोकांनी त्यांच्या घरी टीव्हीच्या माध्यमातून कथा ऐकावी. कथा स्थळ याठिकाणी येऊ नका. ही कथा 17 मेपर्यंत सुरू राहणार आहे, असे सांगण्यात आले.

05
पाटणा येथील तरेत पाली मठात आयोजित हनुमंत कथेचा काल दुसरा दिवस होता. बागेश्वर धाम पीठाधीश्‍वर पं.धीरेंद्र शास्त्री कथा सांगण्यासाठी मंचावर आले, मात्र, कडक उन्हामुळे आणि सुमारे 10 लाख लोकांची गर्दी यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

06
गर्दी नियंत्रणाबाहेर जात होती आणि पंडालमध्ये सर्वत्र धूळ होती. या कारणास्तव कथा मध्येच थांबवताना पं.धीरेंद्र यांनी सोमवारी कथा ऐकण्यासाठी कोणीही येऊ नये, तसेच दिव्य दरबाराचे आयोजन केले जाणार नाही, असे आवाहन केले.

07
सोमवारी दुपारी दिव्य दरबार लागणार होता. पण वाढती गर्दी पाहून पं. धीरेंद्र यांना सोमवारी दिव्य दरबार असल्याने गर्दीत मोठी वाढ होऊ शकते, ज्यामुळे लोकांना धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे दिव्य दरबार रद्द करण्यात आला.

  • FIRST PUBLISHED :
  • पं. धीरेंद्र शास्त्री यांनी स्वतः मंचावरून लोकांना आवाहन केले की, जे लोक रेल्वेचे तिकीट काढून पाटण्याला येत आहेत त्यांनी कृपया परत जावे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement