भारतातील पहिली वॉटर मेट्रो आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे.
भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोची सफर करण्यासाठी प्रवासी खूप उत्सुक आहेत. या मेट्रोची खासियत काय आहे जाणून घेऊया.
वॉटर मेट्रोमुळे लोकांना किफायतशीर आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे. वॉटर मेट्रो कोची आणि त्याच्या आसपासची 10 बेटांवर आणणार आहे.
कोची आणि जवळपासच्या दहा बेटांदरम्यान सुरू होणारी सेवा अशा शहरांसाठी अतिशय उपयुक्त मानली जातं आहे, तिथे पारंपारिक मेट्रो रेल्वेमध्ये अनेक अडथळे आहेत.
कोची वॉटर मेट्रो शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 1,136 कोटी रुपयांचा हा प्रकल्प केरळसाठी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात आहे.
सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनाच्या माध्यमातून शहरातील आर्थिक उपक्रमांना चालना मिळेल असा विश्वास आहे.
यामुळे वेळेची खूप मोठी बचत होईल. यासोबत योग्य दरात प्रवाशांना हा प्रवास करता येणार आहे. 75 किलोमीटर ही मेट्रो प्रवास करणार आहे.