वंदे भारत एक्स्प्रेस हा पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचं जाळ उभारलं जात आहे. मात्र हे करत असताना त्यात काही अडथळे येत आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसचा पुन्हा अपघात झाला. या अपघातात ट्रेनच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतरचे फोटो समोर आले आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसला जनावरं धडकल्याची ही पहिलीच घटना नाही. या प्रकरचे अपघात आधी देखील झाले आहेत. आता या एक्स्प्रेसला सांड धडकल्याची माहिती मिळाली आहे.
कोलवा आणि अरनिया रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना राजस्थानमध्ये घडली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अपघातात ट्रेनमधील प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असले तरी. ट्रेनचा फक्त पुढचा भाग खराब झाला आहे. घटनेनंतर ही ट्रेन 15 मिनिटे थांबली होती. ट्रेनचं नुकसान झालं होतं, तिला अजमेरच्या दिशेने रवाना करण्यात आलं