advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / जेव्हा अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री होळीच्या रंगात दंग होतात! केंद्रीय मंत्रीही सहभागी

जेव्हा अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री होळीच्या रंगात दंग होतात! केंद्रीय मंत्रीही सहभागी

भारत-अमेरिका सीईओ फोरम बैठकीसाठी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो 7 ते 10 मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत.

01
सध्या देशभरात होळीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. यात केंद्रीय मंत्री देखमी मागे राहिले नाहीत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी झालेल्या होळीच्या उत्सवात अमेरिकेचे वाणिज्य मंत्रीही सहभागी झाले होते. यावेळी देशाचे परराष्ट्र मंत्री, क्रीडा मंत्री यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

02
खरंतर अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो यांना या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जीना रायमोंडो ड्रमवर ताल धरताना दिसल्या. तर भाजप नेते मनोज तिवारी यांनी होळीच्या निमित्ताने गायन केले.

03
भारत आणि अमेरिका तीन वर्षांनंतर व्यावसायिक चर्चा करणार आहेत. भारत-अमेरिका सीईओ फोरम बैठकीसाठी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो 7 ते 10 मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी एका अधिकृत निवेदनात असे सांगण्यात आले की, यामध्ये दोन्ही देश आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील.

04
शेवटचा भारत-अमेरिका व्यावसायिक संवाद फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. त्यानंतर कोविड महामारी आणि इतर कारणांमुळे ही बैठक होऊ शकली नाही.

05
वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पुरवठा साखळी मजबूत आणि वैविध्यपूर्ण करण्यावर आणि नवीन उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनासह तीन वर्षांच्या अंतरानंतर चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

06
निवेदनानुसार, "यादरम्यान, 10 मार्च रोजी भारत-यूएस कमर्शियल डायलॉग आणि सीईओ फोरम आयोजित केले जाईल, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली जाईल, जेणेकरून दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी पुनर्संचयित करता येतील."

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या देशभरात होळीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. यात केंद्रीय मंत्री देखमी मागे राहिले नाहीत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी झालेल्या होळीच्या उत्सवात अमेरिकेचे वाणिज्य मंत्रीही सहभागी झाले होते. यावेळी देशाचे परराष्ट्र मंत्री, क्रीडा मंत्री यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

    MORE
    GALLERIES