मुलाने देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे; अशी भावना तेलंगणात राहणारे कर्नल संतोष यांच्या आईने व्यक्त केली.
शहीद संतोष यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी संतोषी, मुलगी अभिज्ञा (९) आणि मुलगा अनिरुद्ध (४) आहे. संतोष यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कुटुंब हादरलं आहे. देशासाठी संतोष यांनी स्वत:चे प्राण अर्पण केले, याचा सर्वांनाच अभिमान आहे
कर्नल संतोष २००४ मध्ये भारतीय सैन्यदलात रुजू झाले. यापूर्वी पाकिस्तानविरोधात झालेल्या चकमकीत त्यांनी तीन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केलं होतं.
कर्नल संतोष यांनी कोरुकोंडा सैनिक स्कूलमधून सैन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांचे वडील उपेंद्र स्टेट बँकेत व्यवस्थापक होते, तेथूनच ते निवृत्त झाले.
मंगळवारी चिनी सैनिकांविरोधात लढताना तीन भारतीय जवानांना वीरमरण आलं. यामध्ये तेलंगणातील कर्नल संतोष हे शहीद झाले. दीड वर्षांपासून ते लडाख बोर्डरवर सेवा देत होते