नववीचा विद्यार्थी सौविक सेठ याने चालल्यावर वीज निर्माण करणाऱ्या बुटाचा शोध लावला. त्या विजेच्या साह्याने मोबाईल, जीपीएस ट्रॅकिंगपासून कॅमेऱ्यांपर्यंत सर्व काही चार्ज करता येत असल्याची माहिती समोर आली आहे. नवव्या इयत्तेत शिकत असणाऱ्या युवकाने हा शोध लावला आहे. या कौशल्याला त्याच्या काकांनी त्याला प्रोत्साहन दिले आहे. यामध्ये त्याला शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनात बक्षीसही मिळाले आहे.
शूज घालून चालल्याने वीज निर्माण करता येते, असा दावा सौविकने केला आहे. यातून 2000 mAh बॅटरी सहज चार्ज होण्याची शक्यता आहे. ही बॅटरी फक्त एक किलोमीटर चालल्यावर चार्ज होऊ शकते. दरम्यान बुटाच्या बाहेर ही सगळी प्रणाली लावण्यात आली आहे. पुढच्या काही काळात बुटाच्या सोलला ही सिस्टीम बसवण्यात येणार आहे.
दरम्यान या बुटाची निर्मीता करणारा सौविकने दिलेल्या माहितीनुसार, मी टाकून दिलेल्या वस्तूंपासून हा स्मार्ट बूट बनवला आहे. या शूजमध्ये जीपीएस प्रणाली आहे जी लहान मुलांसाठी अतिशय सोयीची आहे. एखादे मूल चोरीला गेल्यावर ते शोधण्यासाठी बराच वेळ लागतो. पण हे बूट परिधान करून ते लहान बाळ बाहेर गेले तर याचा उपयोग होणार आहे.
दरम्यान हे शूज स्पाय कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. आजूबाजूला संशयास्पद व्यक्ती असल्यास ते सहज पाहता येते. संशयास्पद व्यक्तीला त्याच्या बुटाला कॅमेरा जोडलेला आहे हे समजेल असा कोणताही मार्ग नाही. चालण्याने गतिज ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून ही वीज निर्माण होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
दरम्यान आईने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तो पाचवीत शिकत होता, तेव्हा तो काकांसोबत चायनीज लाइटचे काम पाहायाच. येथूनच त्याची इच्छा निर्माण झाली. यातूनच त्याने हे शूज निर्माण केले आहे. परंतु या शूजला चांगल्या कंपनीकडून प्रोत्साहन मिळण्याची गरज असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.