साप किंवा नाग पाहिल्यावर अनेकदा लोकांच्या मनात भीती निर्माण होते. पण जेव्हा सापांची जोडी शेतात किंवा अन्य ठिकाणी दिसतात तेव्हा तो क्षण रोमांचकारक असतो. असेच दृश्य छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील अरेकेल गावात पाहायला मिळाले.
सापांची जोडी रोमान्स करताना पाहून गावातील लोक शेतातील कामे सोडून पाहण्यास आले होते. दरम्यान या नाग सापांच्या जोडीच्या खेळाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हे नाग साप जोरात उड्या मारताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याने बोलले जात होते.
नाग सापांची जोडी पाहणे शुभ मानले जाते. खेड्यापाड्यातील लोक याला समृद्धीचे प्रतीक मानतात. मिठी मारताना नागाची जोडी दोन ते तीन फूट हवेत उड्या मारताना दिसली.
दरम्यान सापांच्या जोड्यांचे दृश्य फार कमी लोकांना पाहायला मिळते. ग्रामीण भागात असे दृश्य दिसल्यानंतर त्यावर नवीन कापड टाकतात व नंतर हे नवीन कापड घरी ठेवतात याला शुभ मानलं जातं असे बोलले जाते.