अशोक सिंघल – राम मंदिराचं आंदोलन शिखरावर नेण्यास अशोक सिंघल यांचं सर्वात मोठं योगदान आहे. विश्व हिंदू परिषदेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या सिंघल यांनी गावपातळीपर्यंत आंदोलन येऊन त्याला व्यापक पाठिंबा मिळवला होता. समाजातल्या विविध घटकांचं समर्थनही त्यांनी आंदोलनाला मिळवलं. 2015मध्ये वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
लालकृष्ण अडवाणी- भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी 25 सप्टेंबर 1990ला गुजरातमधल्या सोमनाथ येथून रथयात्रेची सुरुवात केली. राम मंदिर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या रथात्रेचं आयोजन होतं. सगळा देश त्यामुळे ढवळून निघाला. बिहारमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा अडवून अडवाणींना अटक केली होती.
चंपत राय – राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रवक्ते असलेले चंपत राय यांचं नाव सध्या चर्चेत असतं. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव असलेल्या चंपत राय यांनी पडद्यामागे राहून मोठी कामगिरी बजावली आहे. 1984 पासून त्यांनी न्यायालयीन लढाईसाठी कागदपत्र गोळा करणं आणि पुरावे गोळा करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतल्याचं सांगितलं जातं.