येथे कोणीही आपल्या आवडत्या पंतप्रधानांसोबत सेल्फी घेऊ शकतो. यासाठी 'पीएम म्युझियम'मध्ये खास जागा निश्चित करण्यात आली आहे.
तुम्ही तुमच्या आवडत्या पंतप्रधानाच्या शेजारी खुर्चीवर बसून फोटो क्लिक करू शकता. येथे दोन खुर्च्या आहेत, एकावर तुमचा आवडता पंतप्रधान होलोग्राफिक तंत्रज्ञानाने अवतरलेले असतील. तर दुसऱ्या खुर्ची वर तुम्ही बसू शकता. होलोग्राफिक प्रोजेक्शनद्वारे, देशाच्या पंतप्रधानांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून भाषण करताना पाहिले आणि ऐकले जाऊ शकते.
संग्रहालयाला भेट देण्यासाठी 12 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी 3 तिकीट श्रेणी आहेत. प्रथम- भारतीय नागरिकांसाठी 100 रुपये प्रति व्यक्ती ऑनलाइन तिकीट. द्वितीय श्रेणी 110 रुपये प्रति व्यक्ती ऑफलाइन तिकिटांसाठी आहे. तिसरी श्रेणी परदेशी नागरिकांसाठी ऑनलाइन तिकिटांसाठी आहे. प्रति व्यक्ती 750 रुपये आहे. संग्रहालयात तारांगण आहे. त्यालाही फिरायचे असेल तर तिकीट दर अनुक्रमे 150, 160 आणि 1125 रुपये असतील. लाईट अँड साउंड शोचे आयोजन करण्यात आले आहे. जर तुम्हाला एकत्र आनंद घ्यायचा असेल तर तिकिटाचे दर 200, 220 आणि 1,500 रुपये प्रति व्यक्ती असतील. दुसरीकडे, जर तुम्हाला फक्त लाइट आणि साउंड शोचा आनंद घ्यायचा असेल तर 75, 85 आणि 550 रुपयांमध्ये काम करता येईल.
देशाच्या माजी पंतप्रधानांना समर्पित असलेले पंतप्रधान संग्रहालय 15,600 चौरस मीटर परिसरात सुमारे 217 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे. देशाच्या 14 माजी पंतप्रधानांचे जीवन आणि त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती येथे आहे. याद्वारे स्वतंत्र भारतातील सर्व सरकारांची कार्यपद्धती आणि देशाचा समृद्ध लोकशाही इतिहास जाणून घेता येईल.
संग्रहालयात 40 हून अधिक गॅलरी आहेत. त्यात माजी पंतप्रधानांची छायाचित्रे आहेत. त्यांच्या स्वाक्षरीखाली कागदपत्रे आहेत. त्यांनी लिहिलेली पत्रे आहेत. त्यांच्यासोबत इतरही स्मृतिचिन्ह जोडलेले आहेत.
संविधान निर्मात्या समितीने ज्या खोल्यांमध्ये बसून देशाची राज्यघटना तयार केली त्या खोल्यांमध्ये आपण भेट देऊ शकतो. देशाच्या प्रगतीतील टप्पे यांची साक्ष देणारी चित्रे पाहायला मिळतात.
माजी पंतप्रधानांना मिळालेल्या मानद पदव्या, त्यांच्याशी संबंधित इतर निवडक गोष्टी, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू इत्यादीही येथे ठेवण्यात आल्या आहेत.
टाईम मशीनही आहे. याद्वारे पर्यटकांना भारताच्या भूतकाळात डोकावता येईल. यासोबतच व्हर्च्युअल रिअॅलिटीसह (Virtual Reality) हेलिकॉप्टर राईड आहे, जी भारताचे भविष्य दर्शवेल.
येथे एक मोठा साईनबोर्ड स्क्रीन आहे. यावर तुम्ही 2047 साठी तुमचे विचार लिहू शकता, म्हणजे जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील.