एकीकडे अयोध्येत मंदिर बांधले जात आहे, तर दुसरीकडे तात्पुरत्या मंदिरात भगवान राम ललांची शेवटची जयंती ऐतिहासिक पद्धतीने साजरी केली जात आहे. राम मंदिराचे काम अत्यंत जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
2/ 7
राम मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम जवळपास 75 टक्के पूर्ण झाले आहे, तर भगवान राम ज्या गर्भगृहात राहणार आहेत ते 90 टक्के पूर्ण झाले आहे. रामनवमी निमीत्त आम्ही तुम्हाला मंदिराचे असे फोटो दाखवणार आहे, जे पाहून तुम्ही भक्तीमय होऊन जाल.
3/ 7
2024 मध्ये रामललाच्या मंदिर उद्घाटनाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे तसतसे भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर आकार घेत आहे. मंदिरात 167 खांब बसवण्यात आले आहेत.
4/ 7
ज्या मार्गावरून राम भक्त आपल्या श्री रामाच्या दर्शनासाठी जातील. त्या मार्गावर संगमरवरी दरवाजाच्या चौकटी लावण्यात आल्या आहेत. तीन मार्ग केले असले तरी या चित्रात तुम्हाला मधली वाट दिसते जिथून थेट गर्भगृह दिसणार आहे.
5/ 7
याच ठिकाणी प्रभू रामांची मुर्ती बसवण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम 90 टक्के पूर्ण झाले आहे. हे गर्भगृह अष्टकोनात बांधले जात आहे. गर्भगृहाच्या आत संगमरवरी दगड बसवण्यात येत आहे.
6/ 7
रामललाच्या भव्य मंदिराच्या बांधकामात संगमरवरी दगड बसवले जात असून, त्यात नगारा शैलीचे सुरेख नक्षीकाम केले जात आहे.
7/ 7
तात्पुरत्या मंदिरात रामलला आपले तीन भाऊ आणि सीतेसोबत बसलेले आहेत. रामजन्मोत्सवाच्या दिवशी रामललांना पिवळा पोशाख घालण्यात येणार आहे.