तरुण ट्रान्सजेन्डरच्या प्रेमात पडला. ती इतकी सुंदर होती की तिला पाहून कोणी ट्रान्सजेन्डर असल्याचं बोलणार नाही. तरुणानं ट्रान्सजेन्डरसोबत लग्न केलं मात्र प्रकरणात नवा ट्वि्स्ट आलाय.
आर्य समाज मंदिर रोडवरील लाल मुनी एन्क्लेव्ह अपार्टमेंटमधील रहिवासी सह-शासक पक्षाचे नेते सत्येंद्र सिंह यांचा मुलगा रवी कुमार याने इंस्टाग्रामद्वारे ट्रान्सजेंडर महिला अध्विका चौधरी सिंगशी मैत्री केली आणि प्रेमात पडल्याचं सांगितलं. बराच काळ एकमेकांना समजून घेतल्यानंतर गेल्या महिन्यात 25 जून रोजी दोघांनी लग्न केलं.
तरुणाच्या या निर्णयानं कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे. वडील व भावाच्या छळाला कंटाळून आणि जीवाच्या भीतीने तरुणाने दानापूर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन मदतीची याचना केली.
लग्नानंतर वडील सत्येंद्र सिंह आणि भाऊ धनंजय कुमार यांनी माझ्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आणि तिला षंढ म्हणत तिचा अपमान केला. तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. 60 लाख रुपये हुंडा न दिल्याने तिचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकीही सासरच्या मंडळींनी दिली होती.
आरोपानुसार, 13 जुलै रोजी खगौलमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला होता. ते दोघे कसे तरी जीव वाचवत इकडे तिकडे फिरत आहेत. त्यानं सांगितले की माझी ट्रान्सजेंडर पत्नी बिहार पोलिसांसाठी तयारी करत आहे. त्यांनी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन अॅक्ट 2019 अंतर्गत पोलिसांना संरक्षण देण्याची विनंती केली आहे.
दुसरीकडे ही बाब निदर्शनास आल्यानंतर दानापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर ट्रान्सजेंडर अध्विका चौधरी यांनी सांगितलं की, आम्ही प्रेमात पडलो आणि मंदिरात लग्न केलं, मात्र आता आम्हाला सासरच्या घरी राहू दिले जात नाही आणि अपमानित केलं जात आहे.