गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
2/ 9
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे.
3/ 9
स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची पदवी घेतलेल्या ज्योतिरादित्य यांनी वडील माधव राव शिंदे यांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश केला.
4/ 9
ज्योतिरादित्य यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत लोकांना माहिती असली तरी, त्यांच्या खासगी आयुष्याबाबत फार कमी माहिती आहे. ज्योतिरादित्य यांची पत्नी प्रियदर्शिनी या मीडियापासून दूर राहत असल्या तरी त्यांची चर्चा सोशल मीडियावर होत असते.
5/ 9
प्रियदर्शिनी यांचा समावेश भारतातील सर्वात सुंदर 50 महिलांमध्येही झाला होता.
6/ 9
प्रियदर्शनी यांचा जन्म गुजरातच्या बडोदा येथील गायकवाड या मराठा घराण्यात झाला आहे.
7/ 9
प्रियदर्शनी या एकट्या शिंदे घराण्याचे कामकाज पाहतात. ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शनी यांचा विवाह 12 डिसेंबर 1994मध्ये झाला होता.
8/ 9
प्रियदर्शनी आणि ज्योतिरादित्य यांना दोन मुले आहेत. प्रियदर्शनी ग्वालियरमध्ये जास्त वेळ घालवतात.
9/ 9
प्रियदर्शनी या माध्यमांपासून दूर असल्या तरी त्या नेहमी ज्योतिरादित्य यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात.