

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासआठी जगभरात सध्या वेगवगेळ्या गोष्टी केल्या जात आहे. पण त्यातही सोशल डिस्टन्सिंग सध्या प्रत्येक देशात सक्तीचं करण्यात आलं आहे. पण भारतातल्या या पठ्ठ्यानं सोशल डिस्टन्सिंगसाठी चक्क झाडावरच घर बांधलं आहे. (फोटो-ANI ट्विटर )


हे आहेत उत्तर प्रदेशच्या 'हापुड' जिल्ह्यात राहणारे मुकूल त्यागी. मुकूल हे वकिल आहेत. सोशल डिस्टन्सिंगसाठी त्यांनी चक्क घराच्या जवळच असलेल्या एका झाडावरच आपला आशियाना तयार केला आहे. (फोटो-ANI ट्विटर )


ANI शी बोलताना मुकूल म्हणाले, सध्या कोरोनानं जगात थैमान घातलं आहे आणि यापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी असं झाडावर घर बांधलं आहे. ज्यामुळे मी निसर्गाचा आनंद घेत एकांतात राहू शकतो. (फोटो-ANI ट्विटर )


मुकूल त्यागी त्यांचा पूर्ण दिवस या झाडावरच घालवतात. ते या ठिकाणी पुस्तकं वाचतात. ते म्हणतात यामुळे मला निसर्गाच्या जवळ गेल्यासारखं वाटतं. (फोटो-ANI ट्विटर )