हे काय...रस्ता तर बांधला, पण पूल बांधायलाच विसरलं सरकार
अल्मोडा जिल्ह्यातील ताकुल-सोमेश्वर दरम्यान, अनेक गावांना जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) 15 वर्षांपूर्वी रस्ता तयार केला, पण नदीवर पूल बांधायलाच विसरले. त्यामुळे गावकऱ्यांना नदीच्या वेगवान प्रवाहातही नदी पार करुन जावं लागतं.


उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील सोमेश्वर येथील डझनभरहून अधिक गावातील लोकांना गेल्या 15 वर्षांपासून एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या सर्व गावांना जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ताकुला-सोमेश्वर दरम्यान एक रस्ता बांधला. पण नदीवर पूल बांधला नाही. पूल नसल्यामुळे लोकांना नदी पार कडून यावं-जावं लागतं. (फोटोः न्यूज 18)


सोमेश्वर विधानसभामध्ये बसौली-सोमेश्वर रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत (PMGSY) तयार करण्यात आला होता. परंतु नदीवर पूलाची योजना अद्यापही करण्यात आलेली नाही. पूलाची योजना केवळ कागदावरच असल्याची टीका करण्यात येत आहे. (फोटोः न्यूज 18)


जिल्हा पंचायत सदस्य योगेश बाराकोटी यांनी न्यूज 18शी बोलताना सांगितलं की, पायी चालणारे लोक किंवा वाहनाने जाणारे दोघांनाही नदीच्या वेगवान प्रवाहातून जावं लागतं. त्यामुळे अनेकदा दुर्घटनाही होतात. अनेक वाहनं नदीत अडकली जात असल्याने मोठ्या समस्या निर्माण होतात. (फोटोः न्यूज 18)


स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या वेगात असणाऱ्या प्रवाहामुळे ताकुल ते सोमेश्वर जाणं अतिशय कठिण होतं. विशेषत: लहान मुलं आणि महिलांना नदी पार करताना समस्या येतात. पावसाळ्यात नदीचा प्रवाह अधिक असल्याने मुलांना शाळेत जातानाही मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. (फोटोः न्यूज 18)


PMGSY अल्मोडाचे कार्यकारी अभियंता किशन आर्य यांनी सांगितलं की, अनेकदा हा पूल बनवण्याची योजना आखण्यात आली, परंतु कंत्राटदार न मिळणं, बजेटमध्ये समस्या, यांसारखे अनेक प्रश्न उभे राहिले. मात्र आता लवकरच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या पूलाचं बांधकाम सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (फोटोः न्यूज 18)