Home » photogallery » national » HOW WILL THE TEMPLE OF LORD RAMLALA LOOK AFTER CONSTRUCTION THE TRUST RELEASED NEW PICTURES MHSA

PHOTOS: बांधकाम पूर्ण झाल्यावर असं दिसेल अयोद्धेतील राममंदिर, ट्रस्टने प्रसिद्ध केले नवीन फोटो

Ram Mandir Ayodhya Photos: रामनगरी अयोध्येत भगवान श्रीरामाच्या मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. मंदिराच्या उभारणीसाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जात आहे. मंदिरातील प्रत्येक वस्तू अतिशय खास पद्धतीने सजलेली आहे. रामललाच्या मंदिरात लावण्यात येणारा विजय ध्वजही 10 ते 15 क्विंटल वजनाच्या खांबावर लावण्यात येणार आहे. जमिनीपासून 161 फूट उंच शिखरावर विजय पताका उभारण्यात येणार आहे. याशिवाय वाऱ्यामुळे मंदिर किंवा विजय ध्वजाचं कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. राम मंदिर तयार झाल्यावर कसं दिसेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. ट्रस्टच्या वतीनं अॅनिमेशन इमेज शेअर करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India