गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसामधील स्मशान वेगळं आहे. हे स्मशान आता चक्क पिकनिक स्पॉट बनलं आहे.
हे स्मशान बनवण्यासाठी 5 ते 7 कोटी खर्च आला असून इथं मुलांच्या खेळण्यापासून अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर अनेक देवतांच्या मूर्तींचं दर्शनही इथं घेण्याची संधी आहे. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मुद्दाम अनेक जण स्मशानात येत आहेत.
स्मशानातील अंत्यसंस्काराची जागा आधुनिक पद्धतीनं बनवण्यात आली असून मुलांसाठी खास जागा निश्चित करण्यात आली आहे.
वरिष्ठ नागरिकांसाठी प्रार्थनागृह, पुस्तकालय त्याचबरोबर पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय देखील इथं करण्यात आली आहे.
फक्त 1 रुपयाच्या टोकनमध्ये इथं कोणत्याही व्यक्तीवर अंत्यसंस्कार करता येतात. ( सर्व फोटो : निलेश राणा, प्रतिनिधी, बनासकांठा)