राजधानी दिल्लीमध्ये सध्या यमुना नदीचा प्रकोप पाहायला मिळत आहे. महापुरामुळे दिल्लीसह आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांचे हाल कायम आहे.
यमुनेचे पाणी गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आणि शुक्रवारी सकाळी राजघाटावर पोहोचले. पहाटे तीन वाजेपर्यंत राजघाट पार्क पाण्याखाली होते. यानंतर पुराचे पाणी बापूंच्या समाधीपर्यंत पोहोचले.
अनेक घरं, कार्यालयं, सरकारी कार्यालंय, लाल किल्ला भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या पायरीपर्यंत पाणी आल्याने चिंता वाढली आहे.
गुरुवारपर्यंत पुराचे पाणी ओसरण्याची चिन्हे नव्हती, मात्र आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी लोक 5 वाजता येथे पोहोचले तेव्हा त्यांना संपूर्ण पार्क पाण्याखाली गेले होते.
राजघाटालगतच्या सर्व भागांसाठी ही चिंताजनक स्थिती आहे. आजूबाजूला राहणारे लोक राजघाटाची अवस्था बघायला आले.
पाणी ओसरण्याचे नाव नाही, स्थिती अशीच राहिली तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.