कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर सतत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून वेगवेगळा शोध सुरू आहे. दररोज कोरोना संदर्भात एक नवीन तथ्य समोर येत आहेत. आताही अशीच एक माहिती समोर आली आहे. कोरोना झालेला रुग्ण हा 9 दिवसानंतर संक्रामक राहत नाही.
म्हणजेच, 9 दिवसांनंतर कोरोना रुग्ण हा विषाणू इतर कोणत्याही रूग्णात पसरत नाही. हा अभ्यास medRxivमध्ये छापण्यात आला असून याची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही.
या अभ्यासाचे मुख्य संशोधक म्हणजे मुगे केविक आणि अँटोनिया आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी यासाठी 79 तून अभ्यासातून डेटा गोळा केला आहे. संशोधनात असं दिसून आलं की विषाणू घसा, नाक आणि मलात असूनही नऊ दिवसानंतर विषाणूचे कण संक्रामक होत नाहीत.
रिपोर्टमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, लक्षण दिसल्यानंतर कोरोना व्हायरसचा विषाणूचं अनुवांशिक मेटिरिअल आणि RNA रुग्णाच्या घश्यात किमान 17 ते 83 दिवस असतं. पण हे RNA संसर्गजन्य राहत नाही. संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, PCR चाचणीत हा RNA कमकुवत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे 9 दिवसांनंतर विषाणूचा प्रसार होऊ शकतं नाही.
अभ्यासानुसार कोरोना विषाणूचा RNA श्वसन प्रणालीमध्ये बराच काळ राहू शकतो आणि मलामध्ये बराच दिवस असतो. त्यामुळे संक्रमणाचा शोध लावण्यासाठी व्हायरल RNA वापरला जाऊ शकत नाही.
'कोरोना रूग्णांमध्ये विषाणूच्या व्हायरलचं प्रमाण खूप जास्त असतं, यावर अनेक अभ्यासक सहमत आहेत. कोरोना झाल्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण सर्वात संक्रामक असतो. बर्याच वेळा, जेव्हा रुग्णाची चाचणी केली जाते, तेव्हा तो त्याची संक्रमणाची सीमा पार करतो.' असं संशोधकांचं म्हणणं आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा अभ्यासातून असं समोर आलं आहे की, कोरोना रुग्णांना तात्काळ आयसोलेशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. अशात ज्या लोकांमध्ये लक्षणं दिसत नाहीत त्यांना भविष्यातही संक्रामक होण्याची भीती असते.