

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एक नाव असं आहे ज्यांनी नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करू असं म्हटलं होतं.


काँग्रेसचे इम्रान मसूद यांचं नाव या पहिल्या यादीमध्ये घेण्यात आलं आहे. ते सहारनपुर उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक लढणार आहे.


2014मध्ये इम्रान मसूद यांनी नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'मोदींचें तुकडे करू' असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, 2014च्या निवडणुकांमध्ये मोदी लाटते इम्रान मसूद 1000 मतांनी हरले होते. यावेळी काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांना तिकीट दिलं आहे.


मार्च 2014 च्या निवडणुकांमध्ये इम्रान मसूद यांनी अनेक वादग्रस्त वक्यव्य केली ज्यासाठी ते जेलमध्येही गेले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकाही लढल्या होत्या पण त्यावेळी त्यांनी विजय मिळाला नाही.


इम्रान यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेसला मोठा झटका बसला होता. पण तरीदेखील यावेळी ते सहारनपूरमधून निवडणूक लढणार आहेत.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली होती. त्यावेळीही या काँग्रेस नेत्याने त्यावर प्रश्न उपस्थित केले होते.


या गळाभेटीवर इम्रान मसून म्हणाले की, 'राहुल गांधी यांनी नवाज शरीफ किंवा इम्रान खान यांना तर मिठी मारली नाही ना?'