राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा भागात एका घरात घोणस आढळून आला. राजस्थानमध्ये या प्रजातीचे साप क्वचितच आढळतात. संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना रात्री उशिरा हा साप घरात आला होता. हा साप मुलाच्या डोक्यावर आल्याचे लक्षात येताच तो जागा झाला.
तो लगेच जागा झाला आणि रडू लागला. अडीच ते तीन फूट लांबीचा घोणस जातीचा हा साप असल्याचे कुटुंबीयांनी पाहिले. मुलाच्या वडिलांनी तात्काळ सर्प पकडणारे गोविंद शर्मा यांना फोन करून आपल्या घरी बोलावले.
गोविंद शर्मा जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की हा घोणस प्रजातीचा साप आहे आणि तो अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा असल्याचे सांगितलं. राजस्थानमध्ये हा साप क्वचितच पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितलं.
सर्पमित्र गोविंद शर्मा म्हणाले की, ते अनेक वर्षांपासून साप रेस्क्यू करतात. आतापर्यंत हजारो सापांची सुटका करण्यात आली आहे, मात्र त्याने पहिल्यांदाच कॅट स्नेक साप पकडला आहे. हे साप इथे क्वचितच आढळतात. ते झाडांवर राहतात असेही सांगितलं