advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / 91 वर्षांची महिला रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी करते मदत; नदी ओलांडून घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये

91 वर्षांची महिला रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी करते मदत; नदी ओलांडून घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गौरी देवी मदत करत असल्याने सामान्य नागरिकांचा तिच्यावर प्रचंड विश्वास आहे.

  • -MIN READ | Local18 Tamluk,Purba Medinipur,West Bengal
01
समाजात अशा काही व्यक्ती असतात, ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा असतो. ज्या वयात सामान्य जीवन जगणं इतर वृद्धांसाठी कठीण होतं, त्या वयात गौरी देवी नावाची महिला आश्चर्यकारक काम करत आहे. गेल्या 45 वर्षांपासून ही महिला ग्रामीण भागातल्या नागरिकांना अल्प खर्चात शहरातल्या डॉक्टरांकडे उपचारांसाठी नेण्याचं काम करत आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गौरी देवी मदत करत असल्याने सामान्य नागरिकांचा तिच्यावर प्रचंड विश्वास आहे.

02
हावडा जिल्ह्यातल्या तामलूक इथल्या वैद्यकीय क्वार्टर्समधल्या 91 वर्षांच्या गौरी देवी `मासी` या नावाने परिचित आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांव्यतिरिक्त, विविध औषधांच्या दुकानात आणि पॅथॉलॉजी सेंटरमध्ये गौरी देवींची चांगली ओळख आहे. ही ओळख त्यांच्या कामातूनच निर्माण झाली आहे. गौरी देवी हावडा जिल्ह्याच्या श्यामपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रूपनारायण नदीच्या काठावर असलेल्या गावात राहतात. भौगोलिक परिस्थितीमुळे या परिसरातल्या दहा ते बारा गावांतल्या सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी नदी पार करून तामलूक शहरात जावं लागतं. त्यामुळे उपचारांसाठी जाताना कोणीही सर्वप्रथम गौरी देवीचा शोध घेतं. कारण वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत ते गौरी देवींवर अवलंबून असतात.

03
गौरी देवींनी सांगितलं, की 'मी 45 वर्षांपासून हावडा जिल्ह्याच्या रूपनारायण नदीच्या काठावरच्या नागरिकांसोबत काम करत आहे. रोज मी रूपनारायण नदी पार करून तामलूक शहरात येते'.

04
डॉक्टरांना भेटणं असो अथवा हॉस्पिटलमध्ये दाखल होणं असो, गावातले नागरिक गौरी देवींवर अवलंबून असतात. हे काम गौरी देवी 45 वर्षांपासून अल्प मोबदल्यात करत आहेत. गौरी देवी रोज नावेतून रूपनारायण नदी ओलांडून तामलूक शहरात येत असतात. पतीवर उपचार करण्यासाठी त्या प्रथम तामलूक शहरात आल्या. तेव्हापासून त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींशी चांगला परिचय झाला. गेल्या काही वर्षांपासून त्या रोज रूपनारायण नदीतून नावेनं प्रवास करून रुग्णांना तामलूक शहरात उपचारांसाठी आणतात.

05
गौरी देवींनी सांगितलं, `माझ्या कुटुंबात मुलगा, नातवंडं, सून असे सदस्य आहेत. वयोमानामुळे कुटुंबातले सदस्य मला हे काम न करण्याचा सल्ला देतात; पण मी ही सर्वसामान्यांची बहुमोल सेवा मानते. 100 वर्षांनंतरही कार्यरत राहण्याचा माझा मानस आहे. मला आयुष्याच्या शेवटपर्यंत लोकांसोबत राहायचं आहे. मदतीची गरज असलेल्यांसोबत राहणं ही गेली 45 वर्षं माझी सवय बनली आहे.`

  • FIRST PUBLISHED :
  • समाजात अशा काही व्यक्ती असतात, ज्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा असतो. ज्या वयात सामान्य जीवन जगणं इतर वृद्धांसाठी कठीण होतं, त्या वयात गौरी देवी नावाची महिला आश्चर्यकारक काम करत आहे. गेल्या 45 वर्षांपासून ही महिला ग्रामीण भागातल्या नागरिकांना अल्प खर्चात शहरातल्या डॉक्टरांकडे उपचारांसाठी नेण्याचं काम करत आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गौरी देवी मदत करत असल्याने सामान्य नागरिकांचा तिच्यावर प्रचंड विश्वास आहे.

    MORE
    GALLERIES