मुंबईतील काही ऑटो रिक्षा चालक ग्राहकांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी काही सोयी करतात. याच पद्धतीची एक भन्नाट रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे.
2/ 8
तुम्ही कुर्ला, अंधेरी, वांद्रे या भागात फिरत असाल तर कदाचित तुम्ही ही रिक्षा पाहिली असेल.
3/ 8
सत्यवान गीते यांची ही रीक्षा आहे. या रिक्षामध्ये फोन चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट, डेकस्टॉप मॉनिटर, पिण्यासाठी शुद्ध पाणी, हात धुण्यासाठी वॉश बेसिन यासारख्या सुविधा आहेत.
4/ 8
गीते यांनी रिक्षामध्ये झाडांच्या कुंड्याही ठेवल्या आहेत. त्यांना फुलंही येतात. ती पाहून प्रवासी प्रसन्न होतात.
5/ 8
अनेक महिलांचा, मुलींना मेकअप करण्यास वेळ मिळाला नाही तर या रिक्षात बसून तुम्ही आरामात मेकअप करू शकता. यासाठी इथं मेकअप बॉक्स आणि आरसा आहे.
6/ 8
सत्यवान यांनी त्यांच्या रिक्षामध्ये प्रवाशांना गार वाटावं म्हणून पंखा बसवलाय. त्याचबरोबर त्यांनी तोंड धुण्यासाठी वॉश बेसिनचीही सोय केलीय.
7/ 8
मुंबईतल्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचं अवघड काम गीते करतात. त्यांनी या रिक्षावर वाहतुकीचे नियम लिहिले आहेत.
8/ 8
हे नियम वाचून आणि रिक्षामधील सर्व प्रकारचे सोयी, त्याचं वेगळेपण पाहून प्रत्येक ग्राहक प्रसन्न होतो, असा अनुभव त्यांनी सांगितला.