मुंबई : मुंबई आणि कोकणात पुन्हा एकदा हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. तुम्ही जर विकेण्डचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हे हवामानचं अपडेट पाहाणं महत्त्वाचं आहे.
7 ते 9 जुलै दरम्यान मुंबईसह उपनगरामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन कुलाबा वेधशाळेनं केलं आहे.
मुंबईजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 6 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मुंबई, ठाणे उपनगर भागांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.
६-७ जुलै रोजी खंडाळा, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, वाई, मुळशी येथे जोरदार पाऊस. सर्व घाट भागात प्रवास टाळावा आणि पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ओलांडताना जास्त खबरदारी घ्या