मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ हे गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा केली.
उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे.
. उत्तर प्रदेशात चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशीही चर्चा केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच गुरुवारी दिवसभरात उद्योजक तसेच मान्यवरांच्या 17 विविध बैठका त्यांनी आयोजित केल्या होत्या. या बैठकांमध्ये उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांचीही भेट घेतली.
मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.