राज्याच्या राजकारणामध्ये सध्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासह मनसेचे काही नेतेही सोबत गेले आहेत.
अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे सत्तेचं समीकरण बदलून गेलं आहे. या घटनाक्रमावर राज ठाकरे यांनी ठाकरे शैलीत भाष्य केलं होतं.
तसंच दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.