राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे काही अटी शिथिल करत सर्वसामान्यांना लॉकडाऊनमधून दिलासा देण्यात आला आहे. मात्र नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील रस्त्यांवर अशा प्रकारे गर्दी पाहण्यास मिळत आहे.
मुंबईहुन ठाण्याच्या दिशेनं बाहेर पडत असताना या टोल नाका सुरू होण्याआधीच गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहे.
लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यात आल्यामुळे लोकं आता घराच्या बाहेर पडले आहे. मुंबईत अडकून पडलेल्या लोकांनी आपल्या गावाचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे ही गर्दी झाली असावी.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारीच रस्त्यावर गर्दी पाहून चिंता व्यक्त केली होती. जर लोक गांभीर्याने वागणार नसतील तर आणखी कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा दिला होता.