बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि अँकर सिमी ग्रेवालने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झोपडपट्टीत राहणारी 14 वर्षांची मुलगी दिसत आहे.
ती एका मोठ्या स्किन केअर प्रोडक्टच्या दुकानात जाताना दिसते. मुलीने दुकानात प्रवेश करताच तिच्या समोर तिचे एक अतिशय ग्लॅमरस पोस्टर दिसते, ज्याचा वापर या स्किन केअर प्रोडक्टला प्रमोट करण्यासाठी केला आहे. आलिशान दुकानात हे पोस्टर आणि तिचे पोस्टर पाहून ती मुलगी उत्साहित होते.
मुंबईतील धारावीमधील झोपडपट्टीत राहणारी मलेशा खारवा ही लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सच्या 'द युवती कलेक्शन' या नवीन मोहिमेचा चेहरा बनली आहे.