मुंबईतील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळख असलेल्या काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलचे यंदाचे 24 वे वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही फेस्टिव्हलमध्ये कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, संगीत या सारख्या वेगवेगळ्या विषयातील गोष्टी इथं पाहायला मिळत आहेत. पांढऱ्या घोड्यावर बसलेले कॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या फेस्टिव्हलचं मुख्य आकर्षण आहेत. नवोदीत कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी या फेस्टिव्हलमध्ये प्रोत्साहन दिलं जातं. मुंबई पोलिसांनीही चित्रकलेचा विशेष स्टॉल इथं लावलाय. हा स्टॉलही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. देशभरातील कारागीर या फेस्टिव्हलमध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी तसंच कलाकृतींची विक्री करण्यासाठी येतात. मुंबईकर या फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या कलाकृती पाहण्याबरोबरच त्या खरेदी करण्यासाठी देखील गर्दी करतात.