आज पहाटेपासून मुंबई उपनगराला पावसानं झोडपलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. अगदी लोकल ते रस्ते वाहतुकीवरही या पावसाचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई उपनगरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली, काही ठिकाणी कंबरेएवढं पाणी साचल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
ठाणे ते मुंबईच्या दिशेने मुंबईहून ठाण्याच्या दिशेनेजाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीचा सामना कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना करावा लागत आहे.
नवी मुंबई सह पनवेल,पेण उरण रायगड मध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. पुढील 48 तास मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा दिला आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
ईस्टर्न सबवेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. चेंबूर ते वडाळा दरम्यान वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर कामासाठी जाणार असाल तर थोडं लवकरच निघा.
मुंबई उपनगर, बोरिवली इथे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्याने लोकांना मनस्तार सहन करावा लागत आहे.