आतापर्यंत आपण कोरोना आणि त्यावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या लसीवर अनेक बातम्या पाहिल्या असतील. पण आता कोरोनावर मात करण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई स्थित एका स्टार्टअपने कोरोनाला रोखण्यासाठी असा मास्क तयार केला आहे. ज्याने फक्त नाका-तोंडातून नाही तर संपूर्ण शरीरातून कोरोना रोखण्यासाठी मदत होणार आहे.
मुंबई स्थित स्टार्टअप थर्मासेन्सकडून असा दावा करण्यात आला आहे की, त्यांनी तयार केलेल्या मास्कला International Organization for Standardization (आईएसओ) प्रमाणित अमेरिकी प्रयोगशाळा आणि भारतातील राष्ट्रीय प्रत्यायन बोर्ड (National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories(NABL) मान्यता देण्यात आली आहे.