नवी मुंबईतील इंजिनिअर दुधवाल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. केमिकल इंजिनिअर झालेला हा तरूण चक्क मसाला दुधाचा व्यवसाय करतोय.
निलेशनं पाच वर्ष नोकरी केल्यानंतर हा व्यवसाय सुरू केला. तो फिरत्या गाडीवर गरम-गरम मसाला दूध, रबडी असे दूधाचे पदार्थ विकतो.
नवी मुंबईतील कामोठे आणि खारघरमध्ये मसाला दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी थेट पुणे आणि सांगली जिल्ह्यातून दूध येते.
मसाला दूध तयार करण्यासाठी नऊ ते दहा प्रकारचे मसाले वापरण्यात येतात. खजूर आणि केसर हे महत्त्वाचे दोन पदार्थ या मसाला दुधामध्ये आहेत.
गरम आणि थंड असे दोन्ही प्रकारात हे दूध मिळते. रबडी 60 रुपयांपासून तर केसर मसाला दूध 80 रुपयांपासून मिळते.
मसाला दूध ही संकल्पना सध्या कुठेही पाहायला मिळत नसल्यामुळे मुंबई ठाणे पनवेल अशा विविध भागातून इंजिनिअर दूधवाल्याकडं नेहमी गर्दी असते.