(गणेश दुडम, प्रतिनिधी) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अनेक उपाययोजना करुनही अपघात कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
अशाच एका भयानक अपघाताचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंवरुनच अपघात किती भीषण होता याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार महामार्गावरील संरक्षक लोखंडी दुभाजकावर आदळली.
या अपघातात एक जण गंभीर तर दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. मार्गावरील लोखंडी संरक्षक दुभाजक कारच्या आरपार गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही
हा अपघात उर्से टोलनाक्याजवळ सोमाटणे गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला. कार चालक निलकुसूम अल्वा (वय 35), इवा अमिताभ मुजावर (वय 55), सारा अमिताभ मुजावर (वय 25, तिघेही रा. मुंबई) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.