भूत, प्रेत आत्मा असं या जगात काहीही नसतं असं म्हणतात. अनेकदा वेगवेगळ्या रिसर्चमधून ही सिद्ध देखील केलं आहे. पण असं असलं तरी देखील अनेकांचा असा विश्वास आहे की भूत नावाचं गोष्ट अस्तित्वात आहे. लोक त्यांनी अनुभवलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवरुन या सगळ्यावर विश्वास ठेवतात. जर देव आहे तर भूत देखील आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. या सगळ्यावर लोक आपल्याला जे पटतं त्यावर विश्वास ठेवतात.
आज आम्ही तुमच्यासमोर अशा काही जागांची नाव घेऊन आलो आहोत, ज्या मुंबईतील सर्वात हॉन्टेड जागा असल्याचे मानले जाते, स्थानिक लोक या जागेंबद्दल अनेक कहाण्या सांगतात.
डिसूजा चाळ - ही मुंबईतील अशी चाळ आहे. जिथे रात्रीच्या वेळी महिला फिरत असल्याचा भास अनेकांना होतो. येथे एका महिलेने विहिरीत उडी मारुन जीव दिला होता. तेव्हापासून तिचा आत्मा इथे फिरतो असं तेथील लोक सांगतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी येथील लोक बाहेर फिरणं आणि त्या विहिरीजवळ जाणं टाळतात.
ग्रँड पारडी टावर्स - मुंबईतील उच्चभ्रू लोकांची ग्रँड पॅराडी टावर्स इमारत ओळखली जाते. या टावर्समध्ये 8 व्या मजल्यावर अनेकांचे मृत्यू झाले आहे. तर काही जणांनी आत्महत्या केल्या आहे. 2004 पासून आतापर्यंत 20 जणांनी याच 8 व्या मजल्यावरून आत्महत्या केल्या आहेत. एवढंच नाहीतर एका जोडप्याने आणि त्याच्या मुलाने याच 8 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. तर एका वृद्धाने सुद्धा याच मजल्यावरून आत्महत्या केली होती. तेव्हापासून या इमारतीत 8 व्या मजल्यावर कुणीही फ्लॅट घेण्याची हिंमत करत नाही.
मार्वे आणि मढ आयलंड रोड - मुंबईतील मढ आयलंड पाहिलं नाहीतर काय पाहिलं असं नेहमी म्हटलं जातं. पण मार्वे आणि मढ आयलंड दरम्यान एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली होती. या मार्गावर काही लोकांनी एका नववधू मुलीने मदत मागताना पाहिलं आहे. असं म्हटलं जातं की, एका नववधूची हत्या करून तिला खारफुटीच्या जंगलात फेकून दिलं होतं. त्यामुळे ती या परिसरात पाहण्यास मिळते.
मुकेश मिल - मुंबईतील कोलाबा परिसरातील समुद्राच्या जवळ असलेली मुकेश मिल एक भितीदायक जागा असल्याचे सांगितले जाते. ही जागा ११ एकर परिसरात पसरली आहे. या जागाचं नाव जगातील टॉप १० सर्वात हॉन्टेड जागेमध्ये येते. इथे रात्रीच्या तसेच दिवसाच्या वेळी पॅरानॉमल अक्टिवीटी होत असतात असं म्हटलं जातं.
नसीरवंज वाडी - माहीम स्टेशन जवळ असलेल्या नसीरवंज वाडी हे मुंबईतील एक हॉरर ठिकाणापैकी एक आहे. ही जागा नसीर नावाच्या एका पारशी माणसाची होती. सुमारे 20 वर्षांपूर्वी त्यांची निर्घृण हत्या करून परिसरातील विहिरीजवळ गाडण्यात आलं होतं. त्यानंतर बऱ्याच वेळा इथल्या रहिवाशांनी नसीरला कंपाऊंडच्या आवारात फिरताना पाहिले असल्याचं सांगितलं जात आहे.
पवनहंस क्वाटर्स - हे देखील मुंबईतील सर्वात हॉन्टेट जागेपैकी एक आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की येथे एक भयानक आत्मा फिरत असते.
पूनम चेंबर्स - वरळीतील पूनम चेंबर्समध्ये 1993 च्या बॉम्बस्फोट दरम्यान एक धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर 1997 मध्ये सुद्धा याच इमारतीतील बि-विंगमध्ये लिफ्ट कोसळली होती. या दोन्ही घटनांमध्ये अनेकांचा जीव गेला होता. या दोन्ही घटनानंतर रात्रीच्या सुमारास बी विंगमध्ये अचानक कुणी तरी दार ठोठावतं, आवाज देत असल्याचे आवाज रहिवाशांनी ऐकले आहे. या इमारतीत जर काही काम निघालं तर मजूर नकार देतात.
संजय गांधी नॅशनल पार्क - असं म्हटलं जातं की येथे एका महिलेचा आत्मा फिरत असतो. ज्यामुळे लोक रात्रीच्या वेळी येथे फिरणं टाळतात.