Xiaomi India सर्वोच्च स्थानावर जगभरात पोहोचवणाऱ्या आणि सॅमसंगसारख्या कंपनीला टक्कर देणाऱ्या कंपनीच्या CEO नी राजीनामा दिला आहे. त्यांचा तडकाफडकी राजीनाम्याची सध्या चर्चा सुरू आहे.
2/ 6
रघु रेड्डी यांना कंपनीने चीफ बिजनेस ऑफिसर पदासाठी नियुक्त केलं होतं. 6 वर्षात त्यांनी अनेक वेगवेगळ्या पदांवर काम केलं. स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे.
3/ 6
रघु रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीबाहेर वेगवेगळ्या संधी मला खुणावत असल्याचं रघु रेड्डी यांनी म्हटलं आहे. त्या संधी मला आजमावून पाहायच्या आहेत. त्यामुळे मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
4/ 6
रेड्डी यांचे यांनी अशा वेळी राजीनामा दिला ज्यावेळी कंपनी अनेक कारणांना सध्या चर्चेत आहे. शाओमी इंडियाच्या वार्षिक आकडेवारीवर आणि एकूण ऑडिटसंदर्भात सध्या चौकशी सुरू आहे.
5/ 6
ईडीने एप्रिलमध्ये ५ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बँक मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी केले होते. शाओमी इंडियाने या प्रकरणात कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. सध्या या प्रकरणी कोर्टात निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
6/ 6
रघु रेड्डी यांच्या जाण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र याचा शाओमी ब्रॅण्डवर आणि शेअर मार्केटवर येत्या काळात कसा परिणाम होणार ते पाहावं लागणार आहे.