जगात अनेक गोष्टी महाग आहेत ज्याच्या किंमतीचा आपण फक्त विचारच करू शकतो. या वस्तू विशेष ठिकाणी वापरल्या जातात. या वस्तूंची ग्रॅममध्ये किंमत लाख ते कोटी रुपयांच्या घरात आहे.
जगात अँटिमॅटर हे सर्वात महागडे आहे. याचा वापर अंतराळात जाणाऱ्या उपग्रहांच्या, विमानांच्या इंधनासारखा केला जाऊ शकतो. याची एका ग्रॅमची किंमत 393.75 लाख कोटी रुपये आहे.
अँटिमॅटरनंतर कॅलिफोर्नियम दुसरी महागडी वस्तू आहे. याच्या एक ग्रॅमची किंमत 170.91 कोटी रुपये इतकी आहे. या वस्तूंचा वापर न्यूक्लिअर रिअॅक्टरमध्ये केला जातो.
हिऱ्याचे दागिणे महागडे समजले जातात. पण जगातील सर्वात महाग वस्तूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. याच्या एका ग्रॅमची किंमत 37.81 लाख रुपये इतकी आहे.
चौथ्या क्रमांकावर ट्रिटियम आहे. याचा वापर महागडी घड्याळे, औषधे, रेडिओ थेरपी यामध्ये केला जातो. याच्या एका ग्रॅमची किंमत 18.6 लाख इतकी आहे.
जगातील सर्वात महागड्या वस्तू्ंमध्ये पाचव्या क्रमांकावर टॅफिट स्टोन आहे. रत्न म्हणून वापर केल्या जाणाऱ्या स्टोनच्या एका ग्रॅमची किंमत 12.6 लाख रुपये आहे.