जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे संकेत आहेत. तिथली परिस्थिती अधिक बिकट होत आहे. याचे परिणाम सहाजिकच भारतावरही होत आहे. भारतातील शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड सुरू आहे.
एकीकडे लोकांच्या नोकऱ्या जात आहे दुसरीकडे कंपन्यांचं आर्थिक नुकसान या सगळ्यात मोठा फटका शेअर मार्केटला बसला आहे. अजूनही परिस्थिती म्हणावी तेवढी नियंत्रणात आली नाही त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
शेअर बाजारातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी सेन्सेक्स 142 अंकांनी घसरून 59,464 वर आणि निफ्टी 45 अंकांनी घसरून 17,466 वर बंद झाला. शुक्रवारी निफ्टी बँक 92 अंकांनी घसरून 39,909 वर आणि मिडकॅप 62 अंकांनी घसरून 30,103 वर बंद
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार शेअर बाजारातील दिग्गज तज्ज्ञ मिहीर व्होरा सांगतात की, सध्या बाजाराची सर्वात मोठी चिंता महागाई आहे.
अमेरिकेत 2023 वर्षाची सुरुवात महागाई दराने झाली आहे. घर, गॅस आणि इंधनाच्या वाढत्या किमतीचा परिणाम लोकांच्या खिशावर होत आहे.
14 फेब्रुवारी रोजी यूएस लेबर डिपार्टमेंटने जारी केलेल्या आकडेवारीत असे सांगण्यात आले आहे की जानेवारीमध्ये महागाई दर एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 6.4 टक्के वाढला आहे.
डिसेंबरच्या तुलनेत त्यात ०.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. हा चलनवाढीचा दर अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.
अर्थशास्त्रज्ञांच्या सर्वेक्षणात, वार्षिक आधारावर महागाई दरात 6.2 टक्के आणि मासिक आधारावर 0.4 टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता.