Jaguar: जॅग्वार ही मोठ्या मांजरीमधील प्रजाती आहे. पँथरच्या कुटुंबातली प्रजाती म्हटली जाते. जॅग्वार गाडीचा स्पीड तर बिबट्यासारखा आहे. मात्र नाव मोठ्या मांजरीवरून मिळालं आहे. जॅग्वारला मोठी मांजर म्हणतात. ही मांजर डोंगराळ भागात आढळते. काही भागात ते काळ्या रंगातही उपलब्ध आहे. या मांजराच्या चपळता आणि वेगाचा काही मेळ नाही. यामुळेच या कारचे नाव जॅग्वार ठेवण्यात आले. कंपनी आपल्या कारची तुलना या प्राण्याच्या वेगाशी करते. जर तुम्ही जग्वार वाहने बारकाईने पाहिली तर त्यांच्या समोरच्या टोकाचा आकारही या प्राण्याशी जुळणारा आहे.
टाटा अल्ट्रोझ: टाटाच्या सर्वात लोकप्रिय हॅचबॅक आणि सर्वोत्तम मायलेज मोजणाऱ्या वाहनाला एका विशाल पक्ष्याचे नाव देण्यात आले आहे. अल्बट्रॉस पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ ४६ दिवसांत संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो. या गुणवत्तेमुळे या टाटा कारच्या नावाला प्रेरणा मिळाली आहे. (फोटो: टाटा मोटर्स)
टाटा हॅरियर: हॅरियर हे गरुडाच्या एका प्रजातीचे नाव आहे. ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ते मोठ्या उंचीवरून आपली शिकार पाहण्यात तरबेज असतात. तसेच, जेव्हा तो हल्ला करतो तेव्हा सावजाला त्याची माहितीही नसते. हे ग्लायडरसारखे उडते आणि तासनतास हवेत स्वत:ला बॅलन्स करू शकतात. या गुणांमुळेच टाटाने आपल्या एसयूव्हीला हॅरियर असे नाव दिले आहे. (छायाचित्र सौजन्य टाटा)
आरई थंडरबर्ड: रॉयल एनफिल्ड थंडरबर्डच्या नावामागेही एक मनोरंजक कथा आहे. हे एका पुराणातील पक्ष्याचे नाव आहे. उत्तर अमेरिकेत या पक्ष्याची पूजा केली जात असे. हा खूप शक्तिशाली मानला जायचा. कोणत्याही वादळाला थांबवू शकतो असा त्याचा उल्लेख केला जायचा. या पक्ष्याचा आवाज वादळासारखा असल्याचे सांगण्यात येतं. या शक्ती आणि आवाजाने प्रेरित होऊन या रॉयल एनफिल्ड बाईकला नाव देण्यात आले आहे. (फोटो ओव्हरड्राइव्ह)