Whatsapp वर नवनवीन फीचर्स सध्या येत आहेत. आता आणखी एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना खूप मोठा फायदा होणार आहे. मार्क झुकर्नबर्गने याबाबत घोषणा केली आहे.
Whatsapp वर एखादा चुकीचा मेसेज पाठवला गेला तर आपल्याला तो एडिट करता येत नाही, तो डिलीट करावा लागतो. मात्र आता तुम्हाला मेसेज एडिट करण्याचं फीचर मिळणार आहे. तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर ते एडिट करू शकणार आहात.
यासाठी देखील एक नियम आला आहे. तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर केवळ 15 मिनिटांपर्यंतच तो एडिट करू शकता. त्यानंतर मात्र तो एडिट करता येणार नाही.
WhatsApp वर केलेल्या मेसेजवर टॅब करून तुम्हाला होल्ड करून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथे एडिटचा पर्याय दिसेल. तिथे तुम्ही जे चुकलं आहे ते बदलू शकता.
एडिट मेसेज हा एडिट केल्याचं तिथे दाखवलं जाईल. समोरच्या व्यक्तीला तुम्ही हा मेसेज एडिट केला आहे ते कळणार आहे. म्हणजे दोघांनाही याची माहिती तिथे दिसणार आहे.
चांगली गोष्ट अशी आहे की पुढच्या व्यक्तीला हे कळणार नाही की तुम्ही आधी कोणता मेसेज पाठवला होता. जसे पूर्वीचे ट्विट एडिट ट्विटमध्ये दिसत होते, तसे व्हॉट्सअॅपमध्ये होणार नाही, इथे एडिट हिस्ट्री दिसणार नाही, फक्त एडिट केलेला टॅग दिसेल.
कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, आता युजर्सचे चॅटिंग दरम्यान अधिक नियंत्रण असेल आणि जर मेसेजमध्ये काही चूक झाली असेल तर ती 15 मिनिटांत एडिट करता येईल.
आतापर्यंत व्हॉट्सअॅपमध्ये अनसेंड फीचर होतं, पण एडिट करण्याचा पर्याय नव्हता. सध्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज ६० तासांपर्यंत अनसेंड करता येत होता.
तुम्ही अॅप अपडेट करून देखील तपासू शकता, जर हे फीचर येत नसेल तर काही दिवस थांबा, हे फीचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी आहे लवकरच तुमच्या फोनवर येईल.