मुंबई: रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवल्यानंतर हळूहळू सगळ्याच बँकांनी कर्ज आणि EMI मध्ये वाढ केली आहे. पब्लिक सेक्टरमधील मोठी बँक असलेल्या युनियन बँकेनं ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. आपल्या MCLR मध्ये 5 बेसिस पॉइट्सने वाढ केली आहे. त्यामुळे लोन आणि EMI मध्ये वाढ झाली आहे.
हे नवे दर 11 डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. 7.50% ते 8.60% व्याजदर असेल. त्यानुसार लोन आणि EMI भरावा लागणार आहे. नवे दर 10 जानेवारी रोजी बँकेकडून जाहीर करण्यात येतील. तोपर्यंत आता ह्या नव्या दराने लोन भरावं लागणार आहे.
जेवढा चांगला क्रेडिट स्कोअर तेवढं जास्त लोन मिळणार आहे. याशिवाय युनियन होम लोन घेणाऱ्यांसाठी आणि जे आधीच लोन घेऊन बसलेत अशा दोघांनाही हे नवे दर लागू होणार आहेत.
800 हून अधिक क्रेडिट स्कोअर असल्यास तो सर्वोत्तम मानला जातो. तर ६५० हून कमी क्रेडिट स्कोअर ठिक असतो. त्यामुळे लोन घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर 650 ते 749 या दरम्यान राहिल याची विशेष काळजी घ्या.
जेवढा क्रेडिट स्कोअर वाईट तेवढं जास्त व्याजदर लागतं. याशिवाय महिला आणि पुरुषांसाठी व्याजदराचे निकष वेगवेगळे आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही लोन घेण्याआधी तपासणं गरजेचं आहे.