ट्विटरने सांगितल्याप्रमाणे, 20 एप्रिलपासून ब्लू टिक गायब होणार आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने जगभरातील ख्यातनाम व्यक्ती, खेळाडू आणि नेत्यांच्या ब्लू टिक्स एका झटक्यात गायब केल्या.
आता फक्त त्या लोकांनाच ब्लू टिक मिळणार जे पैसे मोजणार आहेत.एलन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिकबाबत शुल्क जाहीर केले होते.
भारतात आजपासून आता ते लागू करण्यात आले आहेत. जे पैसे भरणार नाहीत त्यांनी ब्लू टिक मिळणार नाही. तुम्हाला दर महिन्याला ब्लू टिकसाठी पैसे भरावे लागणार आहे.
ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दरमहा महिन्याला 650 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
युजर्सना वर्षाचं सब्स्क्रिप्शन करायचं झाल्यास, त्यांना 6,800 रुपयांचा प्लॅन देखील खरेदी करू शकतात.
त्याच वेळी, Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी 900 रुपये प्रति महिना योजना आहे. Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी 9,400 रुपयांची योजना असणार आहे.