मोठ्या टिव्ही स्क्रीनवर सिनेमा पाहण्याची मजा काही वेगळीच असते. जेव्हा मोठा टीव्ही तेवढी जास्त किंमत हा नियम आहे. त्यामुळे प्रत्येक जण मोठा टीव्ही खरेदी करू शकत नाही. मात्र तुमचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. याचं कारण म्हणजे एक कंपनी फ्रीमध्ये मोठ्या स्क्रीनचे टिव्ही देत आहे. (Photo: freetelly.com)
तुम्हालाही पहिल्यांदा विश्वास बसणं कठीण आहे. पण Telly नावाच्या कंपनीने ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आणली आहे. 5 लाख लोकांना फ्रीमध्ये टीव्ही मिळू शकतो. Pluto TV चे को फाउंडर Ilya Pozin यांनी याबाबत घोषणा केली आहे. तुम्ही डुएल स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही फ्री मध्ये मिळवून शकता. (Photo: freetelly.com)
यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. पहिल्यांदी रजिस्ट्रेशन करणाऱ्या लोकांपैकी 5 लाख लोकांना मोफत टीव्ही देण्यात येईल. सध्या ही योजना केवळ अमेरिकेतील बाजारपेठेत उपलब्ध आहे. 55 इंचाचा डिस्प्ले तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर दुसऱ्या स्क्रीनवर हवामान अपडेट्स, खेळाचा स्कोअर, स्टॉक मार्केटचे अपडेट्स मिळतील. (Photo: freetelly.com)
यामध्ये पॉवरफुल साउंड सिस्टीम उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात 5 ड्रायव्हर इमर्सिव्ह साउंड मिळतात. 5 ड्रायव्हर्स म्हणजे तुमचा टीव्ही तुम्हाला चित्रपटगृह किंवा कॉन्सर्टचा अनुभव देईल. यामध्ये ग्राहकांना एक गेम रूम देखील मिळेल, ज्यामध्ये व्हिडिओ गेम्स, आर्केड क्लासिक आणि मल्टीप्लेअर अनुभव उपलब्ध आहेत. (फोटो: freetelly.com)