कमजोर जागतिक बाजारपेठेतील संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून आला आहे. निफ्टी 16,900 च्या खाली ट्रेड करत आहे.
बँक निफ्टीला मोठा फटका बसला आहे. 550 अंकांनी बँक निफ्टीचे शेअर्स कोसळले आहेत. मिडकॅपमध्ये देखील 1.5 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे.
१५ महिन्यात सर्वात स्वस्त क्रूड ऑईल झालं आहे. सध्या 71 डॉलरच्या जवळपास ब्रेंट आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का अशीही एक चर्चा सुरू झाली आहे.
मेटल, IT, रियल्टी, पावर शेअर्सवर मोठा दबाव आहे. बँक, NBFC, सीमेंट, ऑटो यांच्या शेअरमध्येही घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
या सगळ्यात सर्वात जास्त फायदा सोन्याला झाला आहे. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. 61 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे.