तुमची गाडी जर खूप जुनी झाली असेल तर आता तुम्हाला ती रस्त्यावर घेऊन फिरता येणार नाही. स्क्रॅप पॉलिसीचे नियम बदलले आहेत. त्यामुळे १ एप्रिलपासून हे नियम कठोरपणे पाळले जाणार आहेत. तुमची गाडी यामध्ये तर येत नाही आजच चेक करून घ्या.
वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत १५ वर्षांहून अधिक जुन्या सर्व वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. यामध्ये 15 वर्ष जुन्या गाड्या नव्याने रजिस्टर केलेल्या गाड्यांचाही समावेश असेल. या सर्व गाड्या भंगारात काढल्या जाणार आहेत.
हा नवा नियम लागू झाल्यानंतर केंद्र सरकारची वाहने, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारची वाहने, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, राज्य परिवहनची वाहने, सार्वजनिक उपक्रम आणि सरकारी अनुदानित संस्थांची वाहने, जी १५ वर्षांहून अधिक जुनी आहेत, ती स्क्रॅप केली जातील.
या वाहनांमध्ये कोणत्याही लष्कराच्या वाहनाचा समावेश नसेल. हा नवा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. हा नियम बस आणि इतर गाड्यांसाठी लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांगितले की, आम्ही १५ वर्षांहून अधिक जुनी सरकारी वाहने भंगारात जमा करण्याच्या तयारीत आहोत
त्यानुसार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या नियमाशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली होती. ज्याचा अवलंब सर्व राज्य सरकारांकडूनही केला जाणार आहे.