या योजनेअंतर्गत कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 8 वर्षांसाठी कर्ज देण्यात येईल. एसबीआय ग्रीन कार लोन 0.20 टक्के कमी व्याज द्यावे लागेल. एसबीआय ग्रीन कार लोन अंतर्गत गाडीच्या‘ऑन-रोड प्राइस'वर 90 टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ज्यात नोंदणी, विमा आणि एक्सटेंडेड वॉरंटी, एकूण सेवा पॅकेज, वार्षिक देखभाल कराराचा आणि अॅक्सेसरीजचा खर्च यांचा समावेश आहे (फोटो-न्यूज18)
कुणाला मिळेल कर्ज? SBIच्या वेबसाइटनुसार केंद्र सरकारचे कर्मचारी, सैन्य आणि पॅरा मिलिटरी फोर्सचे कर्मचारी आणि संरक्षण उपक्रम करणार्या कर्मचार्यांना या सुविधेअंतर्गत कर्ज घेता येणार आहे. त्याचप्रमाणे Professionals, self-employed, businessmen यांंना देखील हे कर्ज दिले जाईल. कृषि आणि त्यासंबधित क्षेत्रातील व्यक्तींना देखील या योजनेअंतर्गत कर्ज मिळेल. (फोटो-न्यूज18)
कमीत कमी उत्पन्न 3 लाख असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. एसबीआयकडून त्यांना त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 48 टक्के कर्जाच्या रुपात मिळू शकेल. बिझनेसमन, प्रोफेशनल आणि खाजगी नोकरी करणाऱ्यांना आयटीआरमधील डेप्रीसिएशन आणि सर्व कर्जाचे पेमेंट जोडल्यानंतर संबधित व्यक्तीच्या ग्रॉस टॅक्सेबल इनकमच्या किंवा नेट प्रॉफिटच्या 4 टक्के कर्ज मिळू शकते. शेती क्षेत्राशी निगडीत व्यक्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न 4 लाख आहे, त्याना नेट वार्षिक उत्पन्नाच्या 3 टक्के कर्ज मिळू शकते. (फोटो-न्यूज18)