तुम्ही SBI चे ग्राहक असाल किंवा लोन घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुम्ही होमलोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ते फेडण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
SBI ने आपल्या होमलोनच्या किंमती वाढवल्या आहेत. EBLR Rate मध्ये 40 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. 1 जूनपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट होम लोनवर EBLR Rate 7.05% झाला आहे. तुम्ही होमलोन घेणार असाल तर थोडं थांबा नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. नव्या वाढलेल्या दराबाबत तुम्हाला सर्व माहिती वेबसाईटवर मिळणार आहे.
क्रेडिट स्कोअरच्या आधारावर तुम्हाला होमलोन दिलं जातं. जेवढा क्रेडिट स्कोअर कमी तेवढं लोन कमी आणि व्याजदर जास्त भरावं लागणार आहे. त्यामुळे ही सगळी माहिती तपासूनच तुम्ही लोन घेणं गरजेचं आहे.
लोन चुकवलं किंवा लेट केला तर तुम्हाला फाइन बसू शकतो. याशिवाय तुम्ही लवकर लोन भरून पूर्ण केलं तर तुमच्या लोनवरील व्याजदर कमी होऊ शकतं. अर्थात कोणत्या प्रकारचं लोन घेतलं त्यावर हे निर्भर करतं.