RBI ने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनी कर्ज महाग केलं आणि EMI देखील वाढवले. RBI च्या या निर्णयानंतर SBI ने लोन महाग केलं आहे. सरकारी बँक SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जदरात वाढ केली आहे. बँकेने व्याजदरात 0.10 टक्के वाढ केली. नवे दर बुधवारपासून लागू झाले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर ग्राहकांवर वाढले आहेत.
SBI ने व्याजदरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. याआधी बँक ऑफ इंडिया आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ केली होती. बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदानेही करोडो ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.
कॅनरा बँकेने कर्ज स्वस्त केले- कॅनरा बँकेने व्याजदर 0.15 ने कमी केले आहेत. कॅनरा बँकेने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की त्यांनी 12 फेब्रुवारीपासून आपला रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) बदलला आहे.
दर किती कमी झाले? कॅनरा बँकेच्या वेबसाइटनुसार, 'रेपो लिंक्ड लेंडिंग रेट, RLLR चे नवीन दर 12 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. याशी संबंधित सर्व किरकोळ कर्ज योजनांचे दर 9.25 टक्क्यांवर गेले आहेत.
यापूर्वी 9 फेब्रुवारी 2023 रोजी, कॅनरा बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर एका दिवसात आपला RLLR 9.40 टक्क्यांवर बदलला. म्हणजेच त्यात 0.15 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.