एफडीतून ठराविक कालावधीनंतर निश्चित रिटर्न (Fixed Return) मिळतो. म्युच्युअल फंड, शेअर मार्केटपेक्षा एफडीमध्ये जोखीम कमी असल्याने हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो.
सध्या गुंतवणुकीचे (Investment Options) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंड, एसआयपी, सॉव्हरेन गोल्ड बाँड, छोट्या बचत योजना इ. मात्र असं असलं तरीही काही पारंपरिक बचतीचे पर्याय आजही सुरक्षित मानले जातात आणि त्यातील गुंतवणूक देखील कमी होत आहे. अशाच पर्यायांपैकी एक आहे फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) मधील गुंतवणूक. गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा पर्याय असण्याबरोबच एफडी हा एक सुरक्षित पर्याय देखील आहे
अधिकतर बँका 7 दिवसापासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) चा पर्याय उपलब्ध करून देतात. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कालावधी आणि फंड निवडू शकता.
दरम्यान दोन प्रकारच्या एफडी असतात, एकामध्ये तुम्ही निश्चित वेळेआधी पैसे काढू शकता तर दुसऱ्या पद्धतीत अशाप्रकारे निश्चित वेळेआधी (Fixed Deposit Premature Withdrawal) पैसे काढता येत नाहीत. आर्थिक संकट आल्यास किंवा पैशांची आवश्यकता निर्माण झाल्यास अनेकदा एफडी मोडली जाते, वेळेआधी एफडीमध्ये गुंतवलेली रक्कम काढली जाते. मात्र या बदल्यात तुम्हाला काही शुल्क द्यावे लागते.
तुम्ही जर देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडी काढली असाल किंवा काढणार असाल तर तुम्हाला वेळेआधी केल्या जाणाऱ्या विड्रॉलसाठी शुल्क द्यावे लागेल. जाणून घ्या काय आहे हे शुल्क.
FD मध्ये गुंतवलेले पैसे मॅच्युरिटीआधी काढण्यासाठी द्यावं लागेल इतकं शुल्क- 5 लाखांपर्यंतच्या एफडीवर सर्व कालावधीसाठी मॅच्युरिटीआधी काढण्यासाठी 0.50 टक्के शुल्क द्यावे लागेल. याकरता तुम्ही अधिक माहितीसाठी कस्टमर केअर टीमशी 1800-425-3800, 1800-11-2211 किंवा 080-26599990 या क्रमांकावरुन संपर्क करू शकता.